2025 वर्ष सुख-समृध्दी आणि भरभराट घेऊन यावी यासाठी उपाय जाणून घ्या.
नवीन वर्षात काही गोष्टी घरी आणणे शुभ मानले जाते.
या गोष्टी घरी आणल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहील आणि वर्षभर सकारात्मक ऊर्जा कायम राहून कुटुंबात आनंद राहील.
नव्या वर्षात घरी श्री गणेशाची मूर्ती आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल. यामुळे घरी सुख आणि समृद्धी येईल.
या वर्षी घरात दक्षिणावर्ती शंख आणणे लाभदायक ठरेल. घरातील मंदिरामध्ये याची स्थापना केल्याने धनसंपत्तीत वाढ होईल.
हिंदू धर्मात गाईला विशेष महत्त्व आहे. कामधेनू गायीची मूर्ती घरी आणल्याने वर्षभर भरभराट होईल. नवीन वर्षात या वस्तू घरी आणल्याने सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल.
घरात मोर पीस आणणे शुभ मानले जाते. हे घराच्या मंदिरात, पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने लाभ होईल.
वास्तूशास्त्रानुसार, घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी याचे काही नियम आहेत.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.