दुसऱ्यांबद्दल सहकार्याची भावना ठेवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल.
गैरसमज आणि वितांडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल.
लांबच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राखण्यात यशस्वी व्हाल.
तुमच्या कामातील कौशल्याचा बऱ्याच जणांना फायदा होईल.
ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवून काम करावे लागेल.
स्वतःचा अनुभव सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
यश मिळेल पण ते टिकवणेही अवघड आहे, याची जाण येईल.
नव्या उमेदीने कामाला लागाल. महिलांनी आपली अभ्यासू वृत्ती जागृत ठेवावी.
आज सहनशक्ती वाढेल. एखादी उपासना करत असाल त्याचा फायदा होईल.
आज भरपूर काम कराल. परंतु तेवढेच संवेदनक्षमही बनाल.
छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.
कोणत्याही तणावाला बळी न पडता कामाचे योग्य नियोजन करा.