अंक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाबद्दल एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेता येते.
1 ते 9 पर्यंत मूलांक असतात. तुमच्या जन्मताखेवरून मूलांक काढता येतो.
यामध्ये 4 मूलांक असलेले लोक खूप खास असतात.
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो.
या जन्मतारखेचे लोक खूपच आकर्षक असतात. याच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतर व्यक्तींवर पडतो.
या लोकांना प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने करण्याची सवय असते.
त्यांना त्यांची प्रत्येक वस्तू त्याच्या ठरलेल्या जागेवर ठेवायची सवय असते.
या जन्मतारखेचे लोक निर्भिड असतात. ते त्यांच्या कुटुंबासाठी कोणतेही परिश्रम करायला तयार असतात.
हे लोक यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यासाठी कोणतीही जोखीम घेण्यास तयार असतात.
मूलांक 4 असलेले लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.