आज तुम्हाला नवीन संधी मिळतील. कलाकारांना आपल्या कलाकृती दाखवण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.
आर्थिक दृष्टीने चांगले लाभ मिळतील. मानमरातब, प्रतिष्ठा वाढीस लागेल.
आज तुमची खरी गुणवत्ता समाजासमोर येईल. महिलांना कामाची उभारी मिळेल.
अत्यंत धीटपणे उत्साहाने कार्यरत राहाल. काहींना परदेश गमनाची संधी मिळेल.
लांबच्या प्रवास योगाचे बेत आखाल. सूचक स्वप्ने पडू शकतात.
घरात आणि घराबाहेर अतिशय संवेदनशील राहाल. नवीन योजना राबवण्याचे बेत मनात येतील.
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या योजनांना साथ द्याल, त्यामुळे वरिष्ठ खूश राहतील.
स्वप्न पाहिलीत तरी वास्तवाचा भान ठेवावे लागेल. प्रवासात काळजी घ्या.
जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. महिला ध्येयवादी बनतील.
तुमच्या स्वभावाने इतरांची मने जिंकाल. आरोग्याच्या दृष्टीने मात्र सांभाळावे लागेल.
ज्यांना पाठीचं, मणक्याची दुखणं आहे त्यांनी वेळीच औषधोपचार घ्यावेत.
पैशाची परिस्थिती मनासारखी असल्यामुळे खरेदीचे बेत आखाल. नोकरी-व्यवसायात मान मिळेल.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.