हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, आपण सध्या कलियुगात जगत आहोत, जिथे दु:ख, अन्याय आणि हिंसा बळावत आहे.
लवकरच एक वेळ येईल, मानव आपले राक्षसी रूप दाखवतील, त्यावेळी जेव्हा पृथ्वी आतून भंग पावेल. आकाशातून पाऊस पडेल आणि मग एक दैवी शक्ती अवतार घेईल.
धार्मिक मान्यतेनुसार, कालचक्राच्या चार युगांपैकी शेवटचे कलियुग हे अत्यंत अंधार आणि विनाशाने भरलेले आहे.
सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगानंतर आज आपण या कलियुगात जगत आहोत. शास्त्रानुसार, कलियुगाचे वय 4,32,000 वर्षे आहे, त्यापैकी 5000 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.
कलियुगाची पहिली 10,000 वर्षे हा सुवर्ण काळ आहे, जिथे चांगुलपणा आणि आशेचा किरण अजूनही शिल्लक आहे. जिथे देवांची पूजा केली जाते आणि धर्माचे पालन केले जाते, असे मानले जाते.
पण 10,000 वर्षांनंतर अशी वेळ येईल जेव्हा मानवतेचा आणि चांगुलपणाचा नाश होईल. माणूस इतका भ्रष्ट होईल की तो कोणावरही विश्वास ठेवणार नाही. तो आपल्याच लोकांना फसवत राहील.
कलियुगात एक असा काळ जेव्हा सत्य दाबलं जाईल आणि पापाचा घडा भरेल. यानंतर संपूर्ण जग विनाशाच्या मार्गावर असेल.
लोकांना खायला अन्न मिळणार नाही. सर्व नद्या कोरड्या पडतील. दुष्काळ पडेल. पृथ्वी सुकून जाईल आणि आतून फुटेल. राक्षसीवृत्ती वाढेल.
पौराणिक कथांनुसार, या कलियुगाचं अंत करण्यासाठी भगवान विष्णूचा दहावा अवतार घेईल, ज्याचं नाव असेल कल्कि
कल्की हा हिंदू देवता विष्णूचा दहावा अवतार आणि हा भगवान विष्णूचा अंतिम अवतार मानला जातो.
भगवद्पुराणातील माहितीनुसार, अधर्माचा नाश करणे आणि धार्मिकता स्थापित करणे हे त्याचे ध्येय असेल. कल्की मानवी रूपात येईल पण तो योद्ध्याचे रूप घेईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.