हिंदू धर्मानुसार, लग्नाआधी हळदी समारंभ पार पडतो. हळदीचा कार्यक्रम अगदी जोरात असतो.
लग्नापूर्वी वधू-वराला हळद लावली जाते. पण ही हळद नेमकी का लावली जाते? हिंदू धर्मात याचं काय महत्त्व आहे?
लग्नाच्या अनेक विधींमध्ये हळदीचा विधी विशेष का असतो? या सर्वांची उत्तरं आज आम्ही हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जाणून घ्या...
काही ठिकाणी हळदीचा समारंभ लग्नाच्या एक दिवस आधी केला जातो, तर काही ठिकाणी लग्नाच्या दिवशी सकाळी हळद लावली जाते.
पिवळा रंग गुरू, सूर्य देव आणि मंगळ यांच्याशी संबंधित आहे. कारण पिवळ्या रंगातच हलके लाल आणि केशरी रंग असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी चांगला मानला जातो. हळदीचा संबंध गुरूशीही आहे. त्यामुळे लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
हळद नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते. असे मानले जाते की हळद लावल्याने गुरू ग्रहाचा आशीर्वाद राहतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.
याच कारणामुळे ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांना उपाय म्हणून गुरुवारी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण गुरुचा वैवाहिक संबंधांवर प्रभाव असतो.
हळदीचा पिवळा रंग सौभाग्याचा समजला जातो. भगवान विष्णूचा आवडता रंग देखील पिवळा मानला जातो. लग्नासारख्या शुभ कार्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे.
पिवळ्या रंगाला 'पितांबर' असेही म्हणतात जे गुरु ग्रहाचं प्रतीक आहे आणि तो धारण केल्याने गुरुचे सामर्थ्य वाढते. गुरु आपल्या जीवनात भाग्य जागृत करण्याचे काम करतो. त्यामुळे हळदी समारंभात वधू-वर पिवळे कपडे परिधान करून वधूला फुलांनी सजवले जाते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.