मेष रास (Aries)

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.

मिथुन रास (Gemini)

आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer)

तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

सिंह रास (Leo)

जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.

कन्या रास (Virgo)

ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये.

तूळ रास (Libra)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

वृश्चिक रास (Scorpio)

अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावं

धनु रास (Sagittarius)

तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते

मकर रास (Capricorn)

कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडू शकते. कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका.

कुंभ (Aquarius)

पोटदुखीच्या समस्येने तुम्ही खूप त्रस्त असाल,हलके आणि रात्रीचे जेवण कमीत कमी खाल्ले तर बरे होईल.

मीन (Pisces)

तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये सावधगिरी बाळगा, शिळे अन्न टाळा, अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते.