मेष रास (Aries)

तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.

मिथुन रास (Gemini)

आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer)

पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो

सिंह रास (Leo)

त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

कन्या रास (Virgo)

आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते.

तूळ रास (Libra)

तुमचे आरोग्य चांगले असेल पण, जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला सतत चिंता सतावेल. अशा वेळी लगेच उपचार घ्या.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.

धनु रास (Sagittarius)

आज संध्याकाळी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी शतपाऊली करा.

मकर रास (Capricorn)

बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका.

कुंभ (Aquarius)

आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा.

मीन (Pisces)

जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते.