चाणक्य यांचा असा विश्वास होता की, जी व्यक्ती आयुष्यात यश संपादन करते त्यांना अनेक शत्रू असतात. शत्रूंवर विजय मिळवण्याची रणनीती, जाणून घ्या. जर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा सामना करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुमचा शत्रू नेमका कोण हे जाणून घ्या. शत्रूसमोर तुमची कमजोरी कधीही दाखवू नका. त्यापेक्षा त्याच्यासमोर तुमची ताकद आणि सामर्थ्य दाखवा जेणेकरून शत्रू तुम्हाला घाबरत राहील. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी प्रथम रणनीती बनवणे आवश्यक आहे. तुमची रणनीती गुप्त ठेवा आणि वेळ आल्यावर त्याचा वापर करा. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या शत्रूची कमकुवतता शोधा आणि ती तुमच्या रणनीतीमध्ये वापरा. तुमच्या यशात इतके मग्न होऊ नका की तुम्ही तुमचा शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्याला खूप कमकुवत समजू लागाल. चाणक्य म्हणाले की मोठ्या ध्येयासाठी खूप तयारी करावी लागेल. जर शत्रूने पराभव स्वीकारला आणि क्षमा मागितली तर त्याला क्षमा केली पाहिजे.