आज शिस्त आणि वेळेचे बंधन पाळावे लागेल आर्थिक घडी चांगली बसेल.
नवीन घर घेणे किंवा तत्सम व्यवहारांमध्ये अडचणी येतील. पचनशक्ती बिघडण्याची शक्यता आहे.
व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे प्रश्न सोडवताना नाकी दम येतील.
आज पचनशक्ती बिघडण्याची शक्यता. हाताखालच्या लोकांच्या अवास्तव मागण्या सामोपचाराने सोडवाव्या लागतील.
स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. समाजात लोकांशी संबंध येईल. त्यातील भेटणाऱ्या माणसांचा फायदा करून घ्यावा.
महिलांनी मानापमानाच्या कल्पनांना जास्त महत्त्व देऊ नये. घरामध्ये धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभागी व्हाल.
खूप कष्ट पडले तरी त्याचे तुम्हाला काही वाटणार नाही. फिरतीची नोकरी असणाऱ्यांना नोकरी मानवेल.
महत्त्वाचे निर्णय घेताना गंभीर निश्चय धोरणी बनाल. तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये अडकेल.
कोणत्याही कागदपत्रांमध्ये काही अडचणी येत असतील तर स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे मार्गी लागतील.
आर्थिक घडी व्यवस्थित बसेल जोडीदाराची महत्त्वाची कामे होतील.
ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी पथ्य पाणी आवश्यक. औषध पाणी आहार विहार व्यवस्थित ठेवायला हवा.
संधी दार ठोठावते आहे ती संधी आहे हे ओळखा आणि कामाला लागा.