आज तुमच्या अंगी असलेल्या कलेला उत्तेजन मिळेल. मानसिक अवस्था थोडी द्विधा झाल्यामुळे कोणतेही निर्णय पटकन घेता येणार नाही.
आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे चार पैसे हातात राहतील.
आज दिवस थोडा अस्वस्थतेत जाईल. मजेत जगण्यासाठी नित्य बदलत्या आयुष्याचं स्वागत करा.
विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील. महिलांनी राग आवरावा.
कला, लेखन, नाट्य, अभिनय या गोष्टींकडे आज जास्त कल राहील. छानशा मित्र-मैत्रिणी भेटतील.
आज जीवनाचा एक वेगळा रंग अनुभवाल. संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे.
तुमची मतं इतरांना पटणार नाहीत, परंतु तुमच्या विचारात आणि आचारात नाविन्याची झलक असेल.
नोकरी व्यवसाय तुमचे काम वैशिष्ट्यपूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ खूश होतील. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील.
आज एकापेक्षा अनेक कामं करण्याची शक्यता आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याचा अनुभव घ्याल.
तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलल्यामुळे जवळची माणसं दुखावण्याची शक्यता.
नोकरी व्यवसायामध्ये कागदपत्रांमुळे कामं अडली असतील तर ती पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मानसिक अस्थिरता जाऊन क्रियाशील बनाल. उत्तम आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी या दोन्हीमुळे नोकरी-व्यवसायात फायदा होईल.