अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेची मुलं फार रोमँटिक असतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहेत.
या जन्मतारखेची मुलं फार रोमँटिक (Romantic) असतात
ही मुलं आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचंही लक्ष वेधून घेण्यात माहीर असतात.
तसेच शुक्राच्या प्रभावामुळे ही मुलं जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात.
ही मुलं दिसायला आकर्षक आणि मजबूत शरीरयष्टीची असतात.
हे लोक एखाद्याच्या सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.
हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात.
जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि साथ देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)