आज तुम्ही थोडे गंभीर असाल.छोट्या-छोट्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी जास्त निराश होऊ नका.
बुद्धीच्या जोरावर अनेक क्षेत्र पादाक्रांत कराल त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल.
नोकरी व्यवसायात इतरांच्या मनाचा विचार जास्त कराल. परंतु, अव्यवहारी वागून चालणार नाही.
हातचे सोडून पळत्याच्या मागे धावलात तर हातात काहीच पडणार नाही.
तुम्हाला पुष्कळ काही करायचे असेल. परंतु, वेळ, शक्ती, पैसा, परिस्थिती, कुवत या सर्व गोष्टींचा विचार करून पावले उचला.
तरुणांना प्रेमात पडण्याच्या संधी चालून येतील. योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्नही कराल.
आज कोणत्याही गोष्टीसाठी निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. महिलांना भाग्याची साथ मिळणार नाही.
तुमचे ध्येय आणि योजना चांगले असल्या तरी अव्यवहारी असल्यामुळे प्रत्यक्षात उतरू शकणार नाहीत.
मागील काही दिवसांत जो त्रास तुम्ही सहन केलात त्यापासून मुक्तता मिळणार आहे.
तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा संचारेल.
आज कोणालाही न जुमानता कामाला लागाल. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
आज खूप समजुतीचे धोरण स्वीकाराल. प्रकृती मात्र सांभाळा.