कोणतीही गोष्ट टोकाला न्यायची नाही हे ठरवून टाका. महिलांना घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील.
कौटुंबिक जीवनात अचानक घडामोडी घडतील. वाहने सावधतेने चालवा.
व्यवसायामध्ये काही नवीन प्रोजेक्टसाठी गुंतवणूक कराल. महिलांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन मिळेल.
एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे संधी निघून जाऊ शकते.
कधी कधी प्रचंड हट्टीपणामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल. समजुतीचे धोरण ठेवा.
समजूतदारपणा ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील. महिला जरा जास्तच एकलकोंड्या बनतील.
कोणत्याही गोष्टीचा अहंकार यशापासून मागे खेचतो, हे लक्षात राहू द्या.
जोडीदाराशी झालेल्या वैचारिक मतभेदांमध्ये तुम्हालाच दोन पावले मागे यावे लागणार आहे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे, यानुसार वागणूक ठेवावी लागेल.
कितीही प्रतिकार झाला तरी स्वतःची प्रगती करून घेणार आहात.
थोडी अस्थिर मनोवृत्ती राहील. करिअरकडे लक्ष देता देता घरातील लोकांचाही विचार करा.
घरातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली असूनही हात राखून खर्च कराल.