धार्मिक मान्यतांनुसार, ज्या घरात तुळस असते, त्या घरावर देवीचा आशीर्वाद असतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

पण, अनेकदा घरात एकच तुळशीचं रोप लावावं, असं सांगितलं जातं.

Image Source: pinterest

एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं लावणं अशुभ असल्याचं बोललं जातं.

पण, खरंच का? घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं लावणं अशुभ ठरतं का?

Image Source: pinterest

तुमच्या घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं असतील, तर त्यात अशुभ असं काहीच नाही.

Image Source: pinterest

पण, असं सांगितलं जातं की, जर एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं लावायची असतील, तर त्यांची संख्या विषम असली पाहिजे.

Image Source: pinterest

म्हणजेच, तुळशीची रोपं 1, 3, 5, 7 अशा विषम अंकांमध्ये लावावीत.

Image Source: pinterest

तुळशीची रोपं पूर्व आणि उत्तर दिशेलाच लावावीत, अशी देखील मान्यता आहे.

Image Source: pinterest

सोमवार, रविवार आणि बुधवारी तुळशीचं रोप लावणं अशुभ मानलं जातं.

Image Source: pinterest

तसेच, मान्यतांनुसार, एकादशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालणं अशुभ मानलं जातं, यामुळे दोष लागतो.

Image Source: pinterest

संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावून श्रीहरी नामाचा जप केल्यानं भाग्य उजळतं, असं मानलं जातं.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest