नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.
घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा, त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला.
याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे.
कलशावर धागा बांधा. त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा.
तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा.
विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.
( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)