सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत भावनिक विषय असतो. अशा वेळी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नेहमी पाण्यातच का करतात?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर यामागे एक खास पौराणिक कारण आहे.

Image Source: Pinterest

गणपती बाप्पाची स्थापना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला केली जाते.

Image Source: Pinterest

असं सांगितलं जातं की, ह्याच दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता.

Image Source: Pinterest

या दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना करायला सुरुवात केली होती.

Image Source: Pinterest

महाभारत लिहिण्यासाठी त्यांनी गणपतीची प्रार्थना केली.

Image Source: Pinterest

लागोपाठ 10 दिवस गणपती महाभारत लिहीत होते.

Image Source: Pinterest

अनंत चतुर्दशीच्या दिवशी लेखन पूर्ण झालं आणि भगवान गणेश थकव्यामुळे मूर्च्छित पडले.

Image Source: Pinterest

बाप्पाच्या अंगावरची धूळ-माती सरस्वती नदीत स्नान घालून स्वच्छ केली.

Image Source: Pinterest

म्हणूनच गणपतीची स्थापना 10 दिवस केली जाते आणि शेवटी मूर्तीचं विसर्जन पाण्यात केलं जातं.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest