देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा करताना अनेक नियम विसरतात. फक्त पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही, यासाठी आणखी काय करावे लागते? ते जाणून घ्या.
दिवाळीत लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी, दिवाळीच्या अगोदर संपूर्ण घरात साफसफाई करून मुख्य दरवाजाजवळील परिसर स्वच्छ करा.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, घरात सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी सुख, सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी पुढीलप्रमाणे आपले घर सजवा.
दिवाळीच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ करा आणि दरवाजासमोर स्वस्तिक चिकटवा. हे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी उपयुक्त आहे.
स्वस्तिकासोबतच मुख्य दरवाजावर अष्ट मंगला चिन्ह लावा.
मुख्य दरवाजाच्या चौकटीवर मातीचे दिवे ठेवा आणि रांगोळी काढून त्यावर दिवे लावा. प्रत्येक दिव्याला चार वाती असाव्यात, यातील एक वात लक्ष्मी देवीची, दुसरी श्रीगणेशाची, तिसरी कुबेराची आणि चौथी इंद्रदेवाचं प्रतिक आहे.
देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजापासून पूजेच्या खोलीपर्यंत पावलांचे ठसे उमटवा.
मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूचे फुले, आंबाच्या पानांची बनवलेले तोरण लावा.
दिवाळीत पणती लावण्यासाठी शुद्ध तूप वापरावं.
टीप: दिलेल्या सर्व उपाय एबीपी टीम माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी कोणताही दावा करत नाही.