भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजेच ओळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. दिवाळी या सणाला काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात. मात्र, दिवाळीचा शुद्ध शब्द हा दीपावली आहे. मुळात, दिवाळी या शब्दाचा प्रत्येक प्रांतात, भाषेत वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )