Published by: विनीत वैद्य

मेष (Aries)

आज सर्व अडचणींवर मात कराल. संततीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल.

वृषभ (Taurus)

करिअर संबंधी प्रश्न निर्माण होतील. घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील.

मिथुन (Gemini)

खर्चाला अनेक वाटा फुटल्यामुळे बराच पैसा खर्च होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer)

थोड्याशा अनुभवावर अनेक गोष्टी साध्य करणार आहात. महिलांनी स्वतःच्या गुणांची पारख करावी.

सिंह (Leo)

नोकरी व्यवसाय मध्ये उत्तम वातावरणात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तब्येत खुश होऊन जाईल.

कन्या (Virgo)

देखल्या देवा दंडवत करून पुढे जाल तर खूप फायदा होईल. यासाठी कष्टाचे डोंगर तर पार करावे लागतीलच.

तूळ (Libra)

आज तुमच्या स्वभावाला मुरड घालावी लागेल. उत्तम दूरदृष्टी ठेवली तर फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio)

परिस्थितीचा आढावा उत्तम घ्याल. आणि व्यवहारापेक्षा ध्येयवादी जास्त बनाल.

धनु (Sagittarius)

उत्साह आणि आनंदाची उधळण कराल. नवीन ओळखी होतील.

मकर (Capricorn)

कलाकारांना कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळेल. लेखकांना लिखाणात गती लाभेल.

कुंभ (Aquarius)

आज लोकांकडून प्रोत्साहन मिळेल. महिलांची सौंदर्य अभिरुची वाढेल.

मीन (Pisces)

तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम कराल, त्याबाबतीत सर्वांवर प्रभाव पाडाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)