असं म्हणता की, आपल्या घरातून जुन्या चपला, बूटं दिवाळीच्या साफसफाई आधीच घरातून बाहेर काढाव्यात.
यामुळे घरातून दारिद्र्य निघून जाते आणि संख-संपत्तीत चांगली वाढ होते.
तडा गेलेला आरसा किंवा तडा गेलेली वस्तू नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जाते.
असं म्हणतात की, तुटलेली काच जर तुम्हाला घरात कुठे सापडली तर ती बाहेर फेकून द्यावी.
आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे घरातल्या जुन्या वस्तू किंवा तुटलेल्या मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा त्या घरीच सांभाळून ठेवतात.
मात्र, हे करणं फार चुकीचं आहे.
प्रत्येक घरातील कपाट ही अशी वस्तू आहे जिथे सर्वात जास्त पसारा असतो.
अशा वेळी तुमच्या घरातील जुनं कपाटात, कपाटातील जुन्या वस्तू आणि नको असलेलं सामान वेळीच फेका.