वर्षांतून एकदा आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला सहकुटुंब भेट घेऊन यावे. परंतु हे करताना आपल्या नातेवाईकांना भेट देऊ नये.
आपल्या घरच्या देवघरात कुलदेवतेचा फोटो असावा याने घरात सुख-शांती आणि व्यक्तीची वृद्धी होते.
ज्यादिवशी आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेची वारी असेल त्यादिवशी उपास करून त्यांची आराधना करावी.
घरात सतत वर्ष - दोन वर्षांनी सत्यनारायणाची पूजा करावी याने घरात बरकत राहते आणि व्यक्तीच्या कार्यांना यश प्राप्त होत.
आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवता यांची साडीचोळी व नारळ यांनी ओटी भरावी आणि मनापासून भक्तिभावाने आपल्या मनातली इच्छा त्यांच्याकडे मागावी.