संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवास करताना वारकऱ्यांच्या मदतीला पोहोचली रॉबिनहूड आर्मी



शेकडो तरुण-तरुणींची फौज वारकऱ्यांच्या सेवेला



संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज दिवे घाटातून



वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा अशी मानसिकता असणारे तरुण-तरुणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी



पुण्यातील ही सगळी तरुण मंडळी पहाटेपासून वारकऱ्यांच्या सेवेमध्ये दंग



कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे हे सर्वजण दिवे घाट चालून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला मसाज करत होते



तसंच कोणी या वारकऱ्यांना लिंबू सरबत आणून देत आहे तर कुणी फराळाचे वाटप करत होते.



सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल



वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.



दोन्ही पालख्या आधी हडपसर रस्त्याने पुढे दिवे घाटमार्गे सासवड येथे मुक्कामी असणार आहेत.