भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रचंड वेग आला आहे गेल्या 24 तासांत 17 हजार 336 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे ही मागील 100 दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे गुरुवारी दिवसभरात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 24 954 वर पोहोचली आहे मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी करत देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीची माहिती दिली आहे महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात 5,218 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 4989 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2479 रुग्णांची भर पडली आहे. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे