विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ.
देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे.
गळ्यात तुळशीचीमाळ हीच वारकऱ्यांची ओळख असते.
विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही 108 मण्यांची तुळशीमाळ बनते.
मात्र सध्या वारकऱ्यांना खऱ्या तुळशीमाळेऐवजी चायना माळ दिली जात आहे.
खरी तुळशीमाळ कशी ओळखावी हे वारकरी संप्रदायापुढे सध्या सर्वात मोठे कोडे बनले आहे.
मात्र कोणत्याही लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्याला मोठे होल असते.