बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. आर्यन खानच्या पदार्पणाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्यन खानने डिसेंबर 2022 मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असल्याची घोषणा केली होती. आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. आर्यन खानची पहिली सीरिज सहा भागांची असणार आहे. आर्यनच्या पहिल्या वेबसीरिजचं नाव 'स्टारडम' असं असणार आहे. आर्यन खानच्या आगामी वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. आर्यन खानची 'स्टारडम' ही सीरिज पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 27 वर्षांच्या आर्यन खानने 'स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स' या कॅलिफोर्नियातील एका महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. आर्यन सिनेसृष्टीत येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.