दिवंगत अभिनेते इरफान खान यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे.
इरफान खान यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं आहे.
इरफान खान यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
एनएसडी ते हॉलिवूडपर्यंत इरफान खान यांचा बोलबाला पाहायला मिळला आहे.
इरफान आज हयात नसले तरी त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून ते आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.
इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे झाला होता.
इरफानने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं.
इरफानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांता यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं.
'मकबूल', 'रोग', 'लाइफ इन अ मेट्रो', 'स्लमडॉग मिलेनियर', 'पान सिंह तोमर', 'द लंचबाक्स' यांसारख्या चित्रपटांमुळे इरफानला सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळाली होती.
आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला पूर्णपणे न्याय देणारे आणि ती भूमिका अक्षरश: जगणारे अभिनेते म्हणजे इरफान खान होय.