बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्याच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमान खानने नुकतचं रजत शर्माच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली. रजत शर्माने सलमानला विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस? यावर उत्तर देताना दबंग खान म्हणाला,देवाच्या मनात येईल तेव्हा माझं लग्न होईल. सलमान खान पुढे म्हणाला,आता मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल त्या व्यक्तीसोबतच मी संसार थाटणार बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. दबंग खानचे सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर सुरू आहे, अशी चर्चा आहे. सलमानचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.