बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचा आज (26 जून) 38 वा वाढदिवस आहे.
अर्जुन हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या चित्रपटांबद्दल...
2012 मध्ये रिलीज झालेल्या इशकजादे या चित्रपटामधून अर्जुननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अर्जुनसोबत परिणीती चोप्रानं काम केलं होतं.
अर्जुनचा गुंडे हा चित्रपट 2014 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अर्जुननं बाला ही भूमिका साकारली. या चित्रपटातील अर्जुन आणि रणवीर सिंहच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
की अँड का या चित्रपटातील अर्जुन आणि करिना कपूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2016 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 2 स्टेट्स या चित्रपटामधील अर्जुनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
2023 मध्ये अर्जुनचा कुत्ते हा चित्रपट रिलीज झाला. अर्जुननं या चित्रपटामध्ये गोपाळ ही भूमिका साकारली.
2019 मध्ये प्रदर्शित झालेला अर्जुनचा पानिपत हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुनचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.