अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलिवूडमधील टॅलेंडेट अभिनेत्यांपैकी एक आहेत.
अनुपम यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
अनुपम हे 'विजय 69' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
अनुपम यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून अनुपम यांनी त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे.
'विजय 69' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम यांना दुखापत झाली आहे.
अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होणार नाही, असे कसे शक्य होईल? काल विजय 69 च्या शुटींग दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. '
अशोक पंडित,गुरु रंधावा, निना गुप्ता आणि चंकी पांडे यांनी अनुपम खेर यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहे.
अनुपम यांच्या 'विजय 69' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले.
अनुपम यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.