मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
मिताली ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
नुकताच मितालीनं तिचा स्पेनमधील एक खास लूकमधील फोटो शेअर केला आहे.
मितालीनं (Mitali Mayekar) तिचा स्पेनमधील (Spain) एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मिताली ही ओरेंज प्रिंटेड बिकीनी, मोठे इअरिंग्स आणि हातात ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसत आहे.
मितालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'कमेंट्स सेक्शनमध्ये मला ‘आपली संस्कृती’ चे ज्ञान देण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला स्वत:चीच लाज वाटेल.' मितालीच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे.
मिताली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.
असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.
मितालीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.