मेहंदी सोहळ्यातले फोटोदेखील समोर आले आहेत. अंकिता लोखंडेने तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी वीणा नगाराची निवड केली आहे. अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. अंकिता मेहंदीसोहळ्यात मस्ती करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता आणि विकीचा 12 डिसेंबरला साखरपुडा तर 13 डिसेंबरला हळद आणि संगीत होणार असल्याचे म्हटले जात आहे.