छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.
अंकिता लोखंडेने हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती बेबी बंप लपवताना दिसत आहेत.
अंकिताच्या फोटोमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
अंकिता लोखंडेच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अंकिता तू खरचं प्रेग्नेंट आहेस का? गुड न्यूज कधी देणार आहेस? अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
अंकिता लोखंडे 2021 साली विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली.
'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली.
'पवित्र रिश्ता'सह 'झलक दिखला जा 4','कॉमेडी सर्कस' आणि 'एक थी नायिका' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे.
अंकिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.