प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं! हे कवीने उगीच म्हटलेलं नाही. याच ओळीचा खरा अर्थ जगाला सांगणारी एक जोडी सध्या सोशल मीडियावरून जगभरात गाजते आहे.
सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेट जगतात अंजली आणि सुफीची प्रेमकथा प्रचंड चर्चेत आहे.
यातील अंजली ही भारतीय हिंदू मुलगी असून, सुफी ही पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे.
हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान अशा कुठल्याच बंधनात न अडकता या मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत.
अंजली आणि सुफी ही जोडी जातीपातीचं बंधन मोडून जगाला आपल्या प्रेमाची दखल घेण्यास भाग पाडत आहे.
दोघींनीही आपले एकमेकींवरचे प्रेम मोकळ्या मानाने स्वीकारले आहे.
काही काळापूर्वी बोल्ड फोटोशूट करत आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची कथा सांगणारी ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
अंजली चक्र ही मूळची भारतीय हिंदू मुलगी आहे आणि सुफी ही मूळची पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे.
अंजली चक्रने तिची आणि सुफीची प्रेमकहाणी जगासमोर मांडली आहे.
समलैंगिक संबंधांबद्दल बिनधास्त बोलणारी ही जोडी जगभरात लोकप्रियता होऊ लागली आहे.