बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली होती. लवकरच अभिनेत्री नव्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका हिल स्टेशनवर भटकंती करताना दिसत आहे. डोंगरांच्या मध्यभागी नदीच्या काठावर बसून अभिनेत्री फोटो पोज देत आहे. या फोटोंमध्ये तिने चॉकलेटी रंगाची पँट आणि टॉप परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.