अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. अमृता फडणवीस गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमृता फडणवीस या सामाजिक उपक्रमातही सक्रियपणे सहभागी होतात. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. पर्यावरण दिनानिमित्ताने त्यांनी खास फोटोशूटही केले आहे. पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!' असं त्यांनी म्हटले. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस या बँकर असून त्या एक स्वयंसेवी संस्थेचे कामदेखील करतात. अमृता यांच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.