अमृता रावने या मुलाखतीत खुलासा केला की,



अनमोलला 2012 मध्येच अमृताशी लग्न करायचे होते आणि अभिनेत्रीने तिचे अभिनय करिअर सोडावे अशी त्याची इच्छा होती.



अमृता म्हणाली, 'त्यावेळी अनमोल पाहत होता की, माझ्या करिअरचा आलेख सतत घसरत आहे.



मी चुंबन किंवा इंटिमेट सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हते.



आम्हाला वाटले की, आपण आपल्या सुंदर वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.



त्याचवेळी अनमोलची करिअर सोडण्याची मागणी ऐकून मी हादरले होते.



मात्र, नंतर अनमोललाही त्याची चूक जाणवली आणि त्याने आपली मागणी मागे घेतली.’



नुकत्याच एका मुलाखतीत अमृताने तिच्या सिक्रेट वेडिंग आणि पतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले आहे.