बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमित साध हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
अमित साध हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमितनं त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये अमित सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला त्याच्या रंगामुळे लोकांशी बोलण्याचे धाडस होत नव्हते. त्याच्या पालकांनी कधीही त्याची काळजी घेतली नाही, त्यामुळे त्याचा स्वभाव देखील खूप चिडचिडा झाला होता.
अमितनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडले आणि चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.
अमित हा अभिनेता होण्यापूर्वी एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तिथे त्याला 900 रुपये पगार मिळत होता.
त्यानंतर त्याला 'क्यों होता है प्यार' या टीव्ही शोमध्ये आदित्य भार्गवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे अमितला विशेष लोकप्रियता मिळाली.
'काय पो छे', 'सुलतान'यां सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करुन अमितनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.
अमित साध हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो.
अमित हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो.