बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
नीना यांच्या या चित्रपटामधील अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत.
नीना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव सांगितला.
एका मुलाखतीमध्ये पहिला किसिंग सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल नीना गुप्ता यांनी सांगितलं, 'मी दिल्लगी या सीरिअलसाठी एक किसिंग सीन शूट केला होता. तो माझा पहिला किसिंग सीन होता. मी तो सीन करण्याआधी पूर्ण रात्र झोपले नव्हते. मी तेव्हा स्वत:ला सांगितलं की, तू अभिनेत्री आहेस, तू हे करु शकते.'
पुढे त्या म्हणाल्या, 'त्यानंतर मी किसिंग सीन शूट केला. तो सीन शूट केल्यानंतर मी धावत बाथरुममध्ये गेले आणि डेटॉलनं तोंड धूतलं. तो सीन प्रोमोमध्ये दाखवला जाणार आहे, असं मला कोणीतरी सांगतलं.पण तो सीन त्यांना सीरिअलमधून काढावा लागला.'
नीना गुप्ता यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
नीना गुप्ता या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतात.
नीना गुप्ता यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.