अभिनेत्री क्रिती सेनन ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. क्रिती आता निर्माती झाली आहे. क्रितीनं तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'दो पत्ती' असं या चित्रपटाचं नाव आहे. 'दो पत्ती' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असणार आहे. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करुन 'दो पत्ती' या चित्रपटाची घोषणा केली. तीनं सोशल मीडियावर काजोल, कनिका ढिल्लन आणि मोनिकासोबतचा एक फोटो शेअर करुन 'दो पत्ती' या चित्रपटाची घोषणा केली. क्रितीचा आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज झाला. आता क्रितीच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'दो पत्ती' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. क्रितीचा चाहता वर्ग मोठा आहे.