अभिनेत्री काजोल (Kajol) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान काजोलला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत काजोलला तिची मुलगी निसाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला काजोलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काजोलची मुलगी निसा ही स्टारकीड असल्याने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. पापाराझी अनेक वेळा निसाचे फोटो काढतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनेकवेळा निसाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
निसा आणि पापाराझी यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर काजोल म्हणली, 'पापाराझींना कसे सामोरे जायचे हे मी तिला शिकवू शकत नाही, तिने ही गोष्ट अनुभवातून शिकली आहे'
पुढे काजोल म्हणाली,' निसा ही पापाराझींना खूप चांगल्या प्रकारे हँडल करते. ती माझ्यापेक्षा खूप सभ्यतेने आणि सन्मानाने पापाराझींशी वागते. तिच्या जागी जर मी असते तर मी माझी चप्पल कधीच काढली असती.'
काजोलच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाला. काजोलसोबतच तमन्ना भाटिया , विजय वर्मा, तिलोतमा शोम, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकारांनी देखील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे
काजोलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.