अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स कायम चर्चेत असते. काही काळापूर्वी ब्रिटनी स्पीयर्सने तिचा प्रियकर सॅम असगरीसोबत लग्न केलं, पण आता हे लग्नही टिकलं नसल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनी स्पीयर्सने तिच्यासोबत फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर आता तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरीसोबत घटस्फोट घेतल्याचं बोललं जात आहे. घटस्फोटानंतर सॅम असगरीने ब्रिटनी स्पीअर्सला धमकी दिल्याचीही चर्चा आहे. याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती अजून समोर आलेली नाही. दरम्यान, या संदर्भात दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पॉप स्टार ब्रिटनीने अवघ्या 14 महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत लग्न केलं होतं. मात्र, आता त्यांच्या घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. ब्रिटनी स्पीअर्सपेक्षा सॅम असगरी 12 वर्षांनी लहान आहे. ब्रिटनी स्पीअर्स 41 वर्षांची आहे तर, सॅम असगरी 29 वर्षांचा आहे. घटस्फोटानंतर सॅमने ब्रिटनीची वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जात आहे.