94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट 'बॅड बॉय' स्टार विल स्मिथने अमेरिकन कॉमेडियन ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली होती.
या घटनेनंतर एकीकडे विल स्मिथवर टीका झाली, तर दुसरीकडे मात्र ख्रिसचे नशीब उजळले.
त्याच्या आगामी स्टँड-अप शोच्या तिकिटांची किंमत आणि विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे.
टिकपिक या ऑनलाइन तिकीट मार्केटप्लेसने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांनी मागील महिन्यापेक्षा काल रात्री जास्त तिकिट विक्री केल्याचे सांगितले आहे.
टिकपिकने पोस्टमध्ये लिहिले, 'आम्ही ख्रिस रॉकच्या शोच्या तिकिटांची काल रात्री जेवढी विक्री केली, तेवढी गेल्या महिन्याभरातही झाली नव्हती.
18 मार्च रोजी शोचे सर्वात स्वस्त तिकीट 46 डॉलर (3500 रुपये) होते, जे आता 411 डॉलर (31,274 रुपये) झाले आहे.