बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियाचा 'आरआरआर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. आलियाचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. सिनेमात आलिया 'राणी' तर रणवीर 'रॉकी'च्या भूमिकेत दिसणार आहे.