नागपूर शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या

रामटेक या शहराला फार असा प्राचीन इतिहासासह अध्यात्मिक महत्व देखील लाभले आहे

रामटेक गडमंदिर आणि त्या परीघात मोठ्या प्रमाणात

इतिहासाच्या खानाखुणा आजही बघायला मिळतात

त्यातील एक म्हणजे या परिसरात असलेला अंबाळा तलाव हा होय

हा परिसर निसर्गरम्य वातावरणात असून तलावाच्या शेजारी काही ऐतिहासिक स्मारके आढळतात

या वास्तूची निर्मिती नागपूरकर भोसल्याच्या काळात झाली असल्याचे सांगण्यात येते

भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्‍यपू यांच्यात झालेले युद्ध अंबाळा तलाव परिसरात झाल्याचे सांगितले जाते

आजही या तलावाच्या परिसरात अध्यात्मिक पूजा विधी सारखे कार्यक्रम केले जातात

अंबाळा तलावाजवळील वास्तूंना सांस्कृतिक दृष्टीकोनासह आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा महत्त्व आहे.