बेळगावातील नाईक कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपतीसमोर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.



सध्या महाराष्ट्रात धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातोय. तब्बल दोन वर्षांनंतर सगळे सण साजरा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



घरगुती गणपतींनाही आकर्षक अशी सजावट करून, तसेच विविध देखावे साकारून जनजागृतीचे काम केले जात आहे.



बेळगावातील नाईक कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपतीसमोर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.



मंदिराच्या आवारातील मूर्ती, गणपती मंदिर,नाग मंदिर या बरोबरच मंदिरात दर्शनाला आलेले भाविक,आवारातील झाडे, त्यावर बसलेले पक्षी हुबेहूब साकारले आहेत.



महाद्वार रोड येथील नाईक कुटुंबीय दरवर्षी आपल्या घरातील गणपती समोर वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करतात.



मागच्या वर्षी मुंबईच्या चाळीची प्रतिकृती त्यांनी सादर केली होती. यावर्षी त्यांनी श्री कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती सादर केली आहे.



हा देखावा सादर करण्यासाठी त्यांना बारा दिवसाचा कालावधी लागला.