लवंग शरिरासाठी गुणकारी मानली जाते. लवंग जेवणाची चव वाढवते तसेच सुगंधही देते. दररोज लवंग खाल्यास अनेक फायदे मिळतात. सायनसच्या रुगणांनी लवंग भाजून खावी. अपचनाची समस्या टाळायची असल्यास लवंगाचे सेवन करावे. चेहऱ्यावरील पुरळ, काळे डाग काढण्यासाठी लवंगाचा फेस पॅक वापरावा. सर्दीचा त्रास टाळायचा असल्यास लवंगाचे सेवन करावे. लवंग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. दात दुखत असल्यास लवंगाचे तेल वापरावे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.