दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. दीपिका मुंबईहून फ्रेंच रिव्हेरा येथे गेली आहे, जिथे 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. दीपिका या फेस्टिव्हलची ज्युरी असणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहणार आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिका 2017 पासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नियमित रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवत आहे. या वर्षीही ती रेड कार्पेटवर आपल्या स्टाईलने धुमाकूळ घालणार आहे. दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.