बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाने इंस्टाग्रामवर 70 मिलियनचा टप्पा पार केला आहे. आलिया भट्ट इंस्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन झाली आहे. आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलियाचा ब्रह्मास्त्र सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ब्रह्मास्त्रच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे. आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. आलियाचा 'डार्लिंग' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आलियाचा 'डार्लिंग' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.