आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलचा पंधरावा हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने येणार आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या हंगामात तो कोलकाताच्या संघाकडून खेळणार आहे. म्हणजे, तो आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ठरेल. आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा आरोन फिंच पहिला खेळाडू असेल. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात फिंच कोलकात्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे.